रचनावाद अध्यापन पद्धती


 mathas rachanawad pdf येते क्लिक करा
लर्निंग शीट pdf येते क्लिक करा
P SM TEST  TADALI  pdf येते क्लिक करा
                 

🍀🍀🍀 ताडाळी बीटात गणित कार्यशाळा📘📕📕📘 
✍आज 23 फेब्रुवारी ला वर्ग  5 ते 8 ला गणित शिकविणार्या सर्व शिक्षकांची (खाजगीसह ) कार्यशाळा  मा. फटिंग सर शि. वि. अ.  ताडाळी बीट यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. भोयर सर केंद्र.प्रमुख मोरवा यांच्या  उपस्थितीत जि. प. शाळा  चिंचाळा येथे घेण्यात  आली.
✍ उच्च  प्राथमिक स्तरावर गणित साहित्याने कसे शिकवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
✍ संख्याज्ञान करोडो पर्यंत  कसे करावे हे सोप्या पद्धतीने समजावुन सांगितले. 
✍संख्या स्थळाची प्रतिके वापरून  बेरीज व वजाबाकी करण्यात आली. 
✍गुणाकार  करण्याच्या तीन पद्धती खरोखरच नविन  होत्या. 
✍मोठ्या  संख्याचा भागाकार साहित्य वापरून कसा करावा याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. 
✍आज सर्व घटक LED MIRA DEVICE द्वारा मा.फटिंग सरांनी उत्तम रितीने समजून सांगितले. 
✍ असर अहवालानूसार गणित क्रियेत मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक संजिवनी मिळाल्याचा भास सर्वाना झाला.
✍ सर्वाना लवकरात लवकर  वर्गात जाऊन या प्रकारे शिकावे याची उत्सुकता लागली होती. 
✍  सदर पद्धतीने गणित  शिकवल्यास कमी वेळात  विद्यार्थी तयार होऊ शकतो याची खात्रीच झाली. फक्त सराव देण्याची गरज आहे. 
 ✍धन्यवाद  साहेब  वर्ग  5 ते 8 ला गणित  विषयाच्या  मार्गदर्शनाची आम्हा सर्वाना गरज होती. 
✍आजची गणित  कार्यशाळा  उत्तम  होती. 👌🏻👌🏻👌🏻👍 💐💐💐💐💐💐💐
 शब्दांकन🎤
🎤 वंदना वनकर🎤🎤
शाळा   चिंचाळा
बीट  ताडाळी
                       डिजिटल एल ई डी कलासरूमचे उदघाटन .
-----^^^-------^^^^^^^--------^^^----
     वृत्तांत

मा. एम.डी. सिहं मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर यांचे आगमन जि. प.उच्च प्राथ.शाळा, खुटाला येथे झाले औचित्य होते डिजिटल एल ई डी कलासरूमचे उदघाटन .
मा. एम डी सिहं मुख्य कार्यकारी अधिकारी ,चंद्रपूर यांनी रिबन कापून एल ई डी कलासचे उदघाटन केले.
   मा. संजय  डोर्लीकर शिक्षणाधिकारी (माध्य),मा. राजू आनंदपवार बी.डी. ओ,शारदा मोगरे ग.शि. अ. यांची सुद्धा उपस्थिती
इयत्ता 6 वी च्या मुलांनी यूट्यूब, गूगल यावरून शैक्षणिक व्हिडिओ डाउनलोड करून मा c e o साहेबांना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
शाळेतील सौ वंजारी मॅम यांचे कडून शाळेला ही एल ई डी भेट मिळाली आहे.
मुलांनी व्हिडिओ वरून भाषा,गणित,हिस्टरी,विज्ञान या विषयावरील व्हिडिओ बघितले.
मा. c e o सरांनी शिक्षक तथा विद्यार्थी यांचे सोबत संवाद साधला.
मुलींनी सरांना कविता दाखवल्या. वर्ग 6 वीची रुक्मिणीने सरांना प्रश्न केला आपण c e o कसे झालात ते मला सांगावे असे विचारले कारण मलाही प्रशासकीय अधिकारी बनायचे . सरांनी तिचे समाधान केले.
मुले स्वतः संपूर्ण डिजिटल क्लास   सुरवातीपासून हाताळतात ही बाब सर मोठया कौतुकाने पाहत होते.
मुलांच्या व साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय आनंददायी दिसत होते.
डिजिटल कलासची प्रेरणा आमचे बिट शि. वि. अ. मा. फटींग सर तसेच केंद्र प्र. खोब्रागडे मॅम यांचे कडून मिळाली.
c e o सरांनी सर्व मुलांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
अशाच प्रकारे संपूर्ण वर्गखोल्या डिजिटल एल ई डी ने पूर्ण कराव्या असा मानस शाळेचे मुख्या. श्री. Andraskar सर यांनी c e o सरांकडे बोलून दाखवला.
*शब्दांकन*
 कु ज्योती एस. गावंडे
स . शि. Khutala


वर्धा मनपा चे प्रशासन अधिकारी मा.टेंभूर्णे सर वत्यांची टिम तसेच मा.आञाम सर ग.शि.अ देवरी जि.वर्धा यांनी ताडाळी बीटातील इंदिरानगर,पडोली,खुटाळा,
चिंचाळा,वांढरी शाळेला आज भेट दिली.इंदिरानगर शाळेंनी
  आभाळाची माया या कवितेचे कृतीयुक्त गायनकेले.
  कवितेत आलेल्या शब्दांचे चिंतन करुन लेखन केले.
  गटागटात प्रश्नोत्तरे
  समानार्थि शब्द लेखन
  विरुद्धार्थि शब्द लेखन
  लिंग,वचन,प्रत्येक  शब्दापासून पाच वाक्य.
  वाक्यात उपयोग
  कृतीवरुन म्हणी ओळखने
  परी,शेतकरी,पाऊस या
शब्दांपासून कथा,कविता
  शिक्षकांच्या नावावरुन कविता
  चिञ रेखाटन,चिञ वाचन
  वृक्ष तोड,प्रदुषन यावर नाटीका
  सर्वांचे स्वागत तसेच
आभार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट
पद्धतीने  मानले
मा.टेंभूर्णे सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रतीसादाचे कौतुक  केले आणि परत १३फेब्रुवारीला येणार आसल्याचे सांगितले.
मुलांना खाऊसाठी पैसे देऊन मुलांचे*दि.24/1/2017 ला जि.प.उ.प्रा.शाळा आनंदवन शाळेच्या  पाच शिक्षकांनी जि.प.प्रा.शाळा इंदिरानगर चंद्रपुर  (पडोली ) शाळेला प्रगत शैक्षणिक शाळा म्हणून भेट दिली. शाळेच्या मु.अ.कु.पोर्णीमा मेहरकुरे यांनी शब्दसूमनांनी स्वागत केले.*
*त्यानंतर वर्ग 4 थी च्या मुलींनी उत्तम प्रकारे प्रस्तावना करून वर्गात येण्यास सूचित केले.* *त्यानंतर आम्ही सर्वांनी वर्ग 4 थीत प्रवेश केला. वर्गशिक्षिका कु. मेहरकुरे यांनी आभाळमाया ही कविता कृतियुक्त तालासूरात शिकविली.त्यानंतर कवितेवर आधारित विविध प्रश्नांची उकल केली.* *कवितेत आलेले शब्द फळ्यावर लिहा.त्या शब्दांचे समानार्थी, विरूद्धार्थी शब्द मुलांनी सांगितले. पुल्लिंग ,स्ञिलिंग शब्द ओळखले ,शब्द शब्दावरून प्रत्येकांनी चार ओळींचे काव्य तयार केले. वाक्यात उपयोग केले.*
*एका गटाने प्रश्न तयार केला, दुसर्या गटाने उत्तर दिले. शब्दांचे शेवटचे अक्षरापासून शब्द तयार करत होती. कृतीयुक्त मुक्या हालचाली वरून म्हणी ओळखत होते .शेवटी मोबाईल वरील कविता गुणगुणत चिञ रेखाटत होती.*
*वर्ग 1ला वर्ग शिक्षिका कु.श्रीरामे मॅडम अध्यापन करीत होत्या, सर्व मुले चार अंकी संख्येची हातच्याची बेरीज - वजाबाकी एक अंकी संख्येचा गुणाकार, भागाकाराची उदाहरणे सोडवित होती. त्याचे शब्दरूपात वाचन करत होती. सर्व अंकाचे चार अंकी संख्येचे इंग्रजीत वाचन करीत होते. मराठीत शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग, काव्य तयार करीत होते. दोन्ही वर्गाचा शैक्षणिक दर्जा पाहून आश्चर्य वाटले!*
*मला सदर मुले खुपच हुशार वाटली. शिक्षकांनी खुप जिवापाड मेहनत घेतली.*
 *या कार्याच्या मागे मार्गदर्शन असल्याशिवाय शक्य नाही.*

*मा.धनपाल फटींग साहेब  (शि.वि.अ.)बीट ताडाळी चंद्रपुर आपले  सुद्धा कोटी कोटी अभिनंदन!*

*श्याम लेडे*
 स.शि.जि .प. उ.प्रा.शाळा, आनंदवन
पं स.वरोरा
जि.चंद्रपूर
                                                     अपूर्व विज्ञान मेळावा'
  दि.25/1/17ला जि. प. शाळा कोसारा  येथे'अपूर्व विज्ञान मेळावा' व 'बाल आनंद मेळावा' याचे आयोजन करण्यात आले. यात--
  ज्वलनास आॅक्सिजन मदतकरतो.
  खाण्याआधी हात का धुवायचे?
  कुठले पारडे जड
  पाण्याचा दाब
  हृदयाचे ठोके मोजणे
  साबणाचे बुडबडे☀अपूर्व विज्ञान मेळावा☀
                                                   जि.प.उ.प्रा.कें.शाळा, मोरवा
आज दि.२३/०१/२०१७ रोज सोमवारला शाळेत 'अपूर्व विज्ञान मेळावा ' घेण्यात आला.यात सर्व विद्यार्थी सहभागी झाले.
  शरीराचे अवयव   वनस्पतीचे अवयव  प्रवाहिता  स्पर्शज्ञान   पारदर्शक व अपारदर्शक पदार्थ  चव ओळखणे   रंग एक काम अनेक  स्थितीज उर्जा  पाण्याला आकार नसतो  ज्वलनास आॅक्सिजन मदत करतो  तरंगणाऱ्या व बुडणाऱ्या वस्तू  हवेचा दाब  कोण कोठे राहतो.
     अशा प्रकारचे प्रयोग विदयार्थी वर्गाने सादर केले.
    या मेळाव्यात मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
    या प्रयोगातून मुलांची शोधक प्रवृती,जिज्ञासा,सहकार्याची भावना दिसून आली.
शब्दांकन
सौ. घाटे

  पेन्सिलच्या टोकावर कागदाचा तोल सांभाळणे
  विरघळणे
  पारदर्शक व अपारदर्शक पदार्थ
  पाण्याला आकार नसतो
  बुडणे-तरंगणे
  चव ओळखणे
  स्पर्शज्ञान
  हवेचा दाब
  पाणी शुद्धीकरण
  कडधान्य ओळख
  अन्नघटक
  पतंगाला आधार काडीचा,शरीरालाआधार हाडाचा
इ.चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यानंतर
दुपारच्या सत्रात'बालआनंद मेळावा'
घेण्यात आला. यात गाणी,कविता,नाटुकले,रांगोळी,कागदकाम व नंतर 'खरी कमाई'हा उपक्रम घेण्यात आला


       
                                          वर्ग 5 ते 8 ची रचनावादी कार्यशाळा

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ताडाळी बीटात मा. फटींग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 5 ते 8 ला शिकविणार्या शिक्षकांची कार्यशाळा आज 30 जानेवारी ला जि. प. उच्च प्राथमिक  शाळा  यशवंतनगर येथे घेण्यात  आली.

रचनावादावर आधारित आदर्श पाठाचे
प्रात्यक्षिक सादर करण्यात  आले.
वर्ग  5 वी चा नागरिकशास्त्र विषयावर  ग्रामपंचायत घटकावर आधारित रचनावादी अध्यापन अल्का रघाटाटे मॅडम यांनी उत्तम प्रकारे  केले. 

भूगोल विषयातील वाहतुकीचे  साधने यावर साखरकर मॅडम यांनी रचनावादी अध्यापन करून सर्व  मुलांचा सहभाग  घेतला.

विज्ञान  विषयावर वर्ग 7 वी चा  जीवनसत्व  घटकावर नाट्यीकरनात्मक पाठाचे अध्यापन तृप्ती बुरघाटे मॅडम यांनी केले.

सपना पिंपळकर मॅडम कोसारा यांनी आपल्या  शाळाभेटीचे अनुभवकथन  केले.

परिसर भेट यशस्वी  करण्यासाठी  नाविण्यपुर्ण बाबी आत्राम सर बेलसनी यांनी  विषद केल्या.

  कमी वेळात  पाठाचे  उत्तम नियोजन करणारे बुरघाटे मॅडम, साखरकर मॅडम, व रघाटाटे मॅडम  यांचे विशेष अभिनंदन.

  इतिहास, भूगोल,  नागरिक शास्त्र, विज्ञान  हे विषय  सुध्दा  रचनावादी पद्धतीने उत्तमरितीने शिकवता येतात  हा विश्वास मा. फटिंग साहेब यांच्या  मूळे सर्वांना  मिळाला. 

यामुळे  पाठात जिवंतपणा येउन मुले आनंदित  होतात हे यावेळी  दिसुन आले.

कार्यशाळेला मा. भोयर सर कें.प्र. मोरवा व मा. खोब्रागडे मॅडम कें.प्र. यशवंतनगर उपस्थित  होते.

धन्यवाद साहेब आपल्या मुळे आम्हाला  नविन प्रेरणा  मिळाली.

वंदना वनकर
चिंचाळाा
                                       कोसारा शाळेला भेट
 दि 30/01/2017 ला मा.श्री एम.डी सिंह मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपूर यांनी कोसारा शाळेला भेट दिली.  त्यांनी मुलांच्या ज्ञानरचनावादाच्या Activity--गणिती क्रिया,साहित्याचा वापर करून संख्यावाचन,पाढे तयार करणे,नकाशावाचन,'गड आला,पण सिंह गेला' याचे नाटट्यीकरण,ताई,आई,पाऊस या शब्दावरून कविता,कथा तसेच e learning इत्यादी बाबी बघितल्या.  मा.सरांनी शा.पो.आहार धान्य व धान्यादि मालाची पाहणी केली. तसेच मुलांच्या वै.स्वच्छतेची व आरोग्याचीही पाहणी केली.यातच काही मुलांना खोकला असल्याचे जाणवल्यावर मा.सरांनी आरोग्यविभागाकडून त्वरीत cough syrupमुलांसाठी मागविले.यावरून ते किती'आरोग्यदक्ष'आहे हे जाणवले.  एकदंरीत आजची ही भेट प्रेरणादायी होती. धन्यवाद सर!

*शब्दांकन*
सुरेखा वनकर
कोसारा,ताडाळी
  धनाने नेतात?         शेती व्यवसायाचे फायदे की तोटे. सहभाग होता.ानी झाले

                                             शाळा भेट दि.16जाने.
 वर्धा जिल्ह्यातील  मा.EO.p,Dy,eo p,शिक्षक  रचनावाद पध्दती  समजून  घेण्यासाठी कोसारा.पडोली विचोडा बु. इंदिरानगर .खुटाळा येते  भेट दिली  मुलांचा प्रतिसाद  ऊल्लेखनीय होता .प्रचंड  आत्मविश्वास  दिसून  आला.या शाळेतील मु.अ. शिक्षक  यांचे  अभिनंदन 
🌱यशवंतनगर येथील  पहिली व दुसरीतील मुले  साहित्य विना बेरीज .वजाबाकी करीत  होती .तसेच गुणाकार .भागाकार क्रिया  साहित्य वापरून करीत  होती .वाचन सर्व मुलांना आले. मुलांनी  शब्दावरुन कथा तयार केल्या ,
🌱इयत्ता तिसरी मधील दोस्त कवितेचे रचनावाद पद्धतीने अध्ययन .
🌱पडोली येथील  मुलांनी कमाल केली .नाट्यीकरण पहिली दुसरी च्या मुलांनी केले . प्रश्न दुसरीचे  उत्तर पहिली चे मुले  देत होती .शब्दांवरुन सर्व मुलांनी कथा केल्या . रचनावादानुसार पाठाचे सादरीकरण
🌱या सर्व शाळेतील  शिक्षक  यांचे कार्य खूपच प्रेरणादायी🌹🌹🌹🁆🌹
पोर्णिमा  मेहरकुरे 
                                           
         
                                                      आदर्शपाठ सादरीकरण
 दिनांक 17 जानेवारी 2017 ला जि. प. उ. प्रा. शाळा मोरवा येथे मा. फटिंग सर यांनी वर्ग 3 रीत ज्ञानरचनावादी पद्धतीने कविता कशी घ्यावी याचे आदर्शपाठ सादरीकरण केले. पंचवीसही शाळेचे मुख्याध्यापक येथे उपस्थित होते .यात लाकडे सर यांनी सुलाभकाची भूमिका पार पाडली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मुद्द्यांचा यात कसा समावेश करून घेता येतो हे या सादरीकरणात दाखविण्यात आले. 
1 कविता ऐकवने
2 कृतीयुक्त सादरीकरण
3 प्रश्न उत्तरे   
4 स्मरणातील शब्द
5 शब्दाची अंताक्षरी
6 शब्दावरून वाक्य
7 वाक्यात उपयोग
8 कविता
9 गोष्ट
10 कल्पना विस्तार
11 नाट्यिकरन
12 आत्मविश्वास
             फटिंग सरांच्या उत्तम मार्गदर्शनाकरिता त्यांचे धान्यवाद.
शब्दांकन
समीना शेख 
मोरवा                        

             कोसारा शाळेला भेट     
 दि.18/1/2017ला दु.4:15वाजता मा.श्री. फटींग सरांनी कोसारा शाळेला भेट दिली.🌼शाळेत येताच सरां नी मुलांशी सुसंवाद साधला.🌼cwsn खुशीने सरांना शब्दकार्ड वाचून दाखविले.🌼सरांनी आज इ.3री विषय मराठी,'दोस्त'कवितेचे ज्ञानरचनावादानुसार सादरीकरण कसे करावे याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.🌼सर्वप्रथम मुलांना कविता गायनासोबतच हावभावयुक्त अभिनय सादर करण्यास सांगितले.सर्वच मुले यात सहभागी झाले.तशी संधीच त्यांना दिली.🌼सरांनी आजच group वर या कवितेचा  Audio  पाठविला होता.त्याचा खुपच उपयोग झाला.🌼कवितेतील स्मरणात असलेले शब्द-गाय, वासरू,गुबगुबीत,उंडारला,भिंगरी, 
दोस्त,लूस,धुंडायला इ.शब्द मुलांनी फळ्यावर लिहिले.लगेचच त्यातील वासरू , गाय,उंडारला याशब्दातील शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे कवितेतीलच शब्द शोधून लिहायला सांगितले.🌼गुबगुबीत,वासरू,गवत हे तीन शब्द एकाच वाक्यात येणारे  पाच वाक्ये तयार करून घेतले.🌼गाय,आई,वासरू या शब्दापासून कविता ,कथा तयार करून घेतल्या.मुलांनी उत्साहाने चांगला प्रतिसाद दिला.🌼वेळ झाल्यामुळे पाठ आटोपता घेतला.🌼  cwsn खुशीने सरांकडे बिस्किटांची  मागणी केली असता लगेचच सर्वांना बिस्किटे सरांकडून देण्यात आले🌼अशाप्रकारे उत्तम मार्गदर्शन, उत्तम सादरीकरण🌹धन्यवाद सर🙏🏼अशीच प्रेरणा घेऊन आपण कार्य करू या.👍🏻
सुरेखा वनकर 
                                      इ.3री मराठीतील 'सुगी'ही कविता 
मान.फटिन्ग सरांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इ.3री मराठीतील 'सुगी'ही कविता ज्ञानरचनावादानूसार 25निकषांवर आधारित घेण्यात आली.
🌻सर्वप्रथम' माळ्याच्या माळ्यामंदी.... 'या चालीवर कवितेचे साभिनय गायन केले.
🌻कवितेतील स्मरणात असणारे शब्द लेखन घेतले.
दोन तिन अक्षरी......तसेच जोडशब्द वाचन 
विशेष म्हणजे मुलांनी त्यातील बोर ,पेरु ,चिंच ही फळांची नांवे ,तसेच चार ,सात या संख्या आल्या हे सांगितले 
समानार्थी ,वीरुद्धार्थी शब्द सांगितले.
झाड ,थंडी याशब्दातिल  शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे कवीतेबाहेरील शब्द सांगितले.
बोर या शब्दापासून कविता व  पोपट ,थंडी ,शेंगा या शब्दापासून कथा तयार केली.
गटात प्रश्न तयार केले व दुसऱ्या गटाने उत्तर दिले.
      सर्व  मुलांचा उत्साह ,सहभाग उत्तम होता.
     एकंदरीत सादरीकरणातून सर्व मुद्दे साध्य झाले.   

मनीषा                                         
                                            नागाळा शाळेला भेट
 दिनांक 19 /1 /2017ला 4.15वाजता मा श्री फटींग सरांनी नागाळा शाळेला भेट दिली 🌷वर्ग 1ली व2री करिता वाघ वासरू मुलगा,  तसेच मुलगी मैडम  शाळा🌷 या तीन शब्दांवरून गोष्ठ तयार करणे 🌷दोन व तीन  शब्दांवरून एक वाक्य तयार करणे 🌷पाऊस या शब्दांवरून कविता करणे 🌷मनातील संख्या ओळखणे हा खेळ चिमुकलयांनी खेळून दाखविला 🌷तन्मय गोहणे वर्ग 1ला या विद्यार्थिने इंग्लिश मध्ये संविधान   महटले  🌷वेळेचे अभावी वर्ग 3,4,5,6,7,तील विद्यार्थिंना एकञ  घेवून कोडे कसे तयार करावे व ते कसे सोडवावे याचा डेमो दिला डेमो प्रत्यक्ष बघून विद्यार्थी कोडे  सोडविणयास प्रवृत्त झाले 🌷मुलांनी उत्साहाने चांगला  प्रतिसाद दिला 🌷वर्ग 7 वी मुलांनी इंग्लिश मध्ये  संवाद सादर केले 🌷अशा प्रकारे  मुलांना व शिक्षाकांना हसतखेळत उत्तम मार्ग दर्शन लाभले     

                  शब्दांकन                                             चंदा सौदागर

                                                       "परिसर भेट " 
या उपक्रमांतर्गत बेलसनी शाळेतील विद्यार्थ्यांनी याच गावातील प्रगतशील शेतकरी श्री भारत पा. मोहितकर यांच्या शेतावर भेट देऊन मोकळ्या नैसर्गिक वातावरणात नाच गाण्याचा आनंद घेताना इयत्ता १ ली च्या विद्यार्थिनी. या परिसर भेटीच्या माध्यमातून इयत्ता ३ ते ७ च्या विद्यार्थ्यांना खालील प्रश्नांच्या आधारे शेतातील वास्तविक माहिती मिळविण्याची संधी उपलब्ध करुऩ दिली --             १) क्षेत्र भेटीचा दिनांक -- २) कोणत्या क्षेत्राला भेट दिली ? ३) शेतमालकाचे नाव -- ४) शेत गावाच्या कोणत्या दिशेला आहे ? ५) गावापासून अंदाजे अंतर किती किमी आहे ?  जाण्यासाठी रस्ता कोणत्या प्रकारचा आहे ? ७) शेताच्या परिसरातील प्राकृतिक रचना कशी आहे ? ८)शेतात कोणत्या रंगाची मृदा आहे ? ९) शेतातकोणकोणती मोठी झाडे आहेत ? १०) पिके कोणती आहेत ? ११) शेतात कोणकोणते पाळीव प्राणी पाळले आहेत ? १२) त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो ? १३) शेतीच्या कामासाठी कोणकोणते अवजारे वापरली जातात ? १४) शेतात जलसिंचनाच्या कोणत्या सोई आहेत ? १५) शेतातील भाजीपाला विक्रीसाठी कोणत्या ठिकाणच्या बाजारपेठेत नेतात ? १६) कोणत्या साधनाने नेतात ? १७) शेतात कोणत्या प्रकारच्या तात्पुरत्या निवारा ची व्यवस्था केली आहे ? १८) याशिवाय शेतात विशेष अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला पहायला मिळाल्या ? १९) सदर शेतीचे निरीक्षण व मिळालेल्या माहिती वरून ही शेती मालकाला फायदेशीर आहे की तोट्याची आहे ? तुम्हाला काय वाटते ते तुमच्या शब्दात लिहा .


                                                   ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषा पाठ 
आज दि ३ जानेवारी २०१७ ला जि. प.उ.प्राथ. कें. शाळा ,मोरवा येथे मा. श्री.धनपाल फटिंग, बीट विस्तार अधिकारी(शिक्षण)यांनी इ.६वी ला ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषा विषयाच्या 'मला बाजाराला जायचं बरं 'या पाठावर पुढील मुद्दांच्या आधारे मार्गदर्शन केले.
१)पाठाचे नाट्टीकरण व त्यावर प्रश्न विचारणे
२)पाठातील उतारा वाचन( दोन मि)
३)स्मरणातील शब्दांचे लेखन
४)पाठातील वाक्यांचा क्रम बदलून फळ्यावर लेखन व क्रम लावून लेखन  करणे.
५)उताऱ्यावर प्रश्न तयार करणे.
६)सात अक्षरी शब्दांचे लेखन व त्यावरून शब्दकोडे तयार करणे.
७)उताऱ्यातील दिलेल्या शब्दापासून वाक्यात उपयोग  करणे.
८)दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून शब्द तयार करणे.
९)दिलेल्या तीन शब्दापासून गोष्ट तयार करणे .
१०)गोष्टीचे वाचन,गोष्टीवर आधारित चित्ररेखाटन, चित्रवाचन.
११)दिलेल्या शब्दापासून कविता तयार करणे.
१२)गोष्टीत आलेल्या शब्दाचे वाक्यात उपयोग,म्हण तयार करणे, समानार्थी शब्द ,विरूध्दार्थी शब्द.
१३)'काळजी घेणे' या शब्दाचा वाक्यात उपयोग वर्गातील सर्व मुलांनी केला.
१४)गोष्ट सांगून उर्वरित गोष्ट मुलांकडून पूर्ण करून घेणे.
                                            ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषा पाठ 
जि.प.उ.प्रा.कें. शाळा ,मोरवा येथे इ ४ थी ला मा. श्री. धनपाल फटिंग ,बीट विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी भेट देवून 'ज्ञानरचनावाद' पध्दतीने भाषेचा 'आनंदाचे झाड' पाठ कशा पध्दतीने शिकविता येवू शकतो याचे मार्गदर्शन केले. सोबत यशवंतनगर केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. श्रीमती रत्नमाला खोब्रागडे मॅडम पण होत्या.
🌼सर्वप्रथम मुलांनी नाट्टीकरण पध्दतीने पाठ सादर केला.
🌼सादरीकरनानंतर मुलांना प्रश्न विचारण्यात आले.सर्व मुलांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
🌼पाठातील एका परिच्छेदाचे दोन-तिन मि. वाचन करुन त्यांना आठवणाऱ्या शब्दांचे लेखन करून घेतले .
🌼प्रत्येक गटाला परिच्छेद वाटून देण्यात आला व त्यावर प्रश्न निर्मिती करण्यास सांगातले.
🌼मुलांच्या एका गटाने प्रश्न तयार केले व दुसऱ्या गटाने उत्तरे दिली.
🌼'शेवगा ' या शब्दाच्या शेवटच्या शब्दापासून तयार होणारे पाठातील शब्द शोधण्यास सांगितले.
🌼शेवगा,गाव,झाड या शब्दापासून मुलांनी गोष्ट तयार केली.
🌼गाव, झाड,चिमणी या प्रत्येकी शब्दापासून मुलांनी कविता तयार केली.
🌼मुलांची नावे(वर्गातील) व रंगबेरंगी   ,नक्षीदार,शेवगा,झाड,पांढराशुभ्र या शब्दापासून वाक्य तयार करून घेतली.
🌼शेवगा या झाडांच्या शेंगाप्रमानेच आपण आणखी कोणकोणत्या शेंगापासून भाजी तयार करतो? यावर मुलांनी वाल, वाटाणा,चवळी,तुरी सोयाबिन इ. शेंगांची नावे सांगितली.
🌼सरांशी बोलत असतांना मुले मनमोकळी व आत्मविश्वासाने बोलत होती.
🌼मुलांचा प्रतिसाद खूपच छान जाणवला.
         एकंदरीत पाठ खूप प्रभावी व परिणामकारक झाला.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
                                   🌷 नेतृत्व  विकास  कार्यक्रम  अंतर्गत इंद्रनागरशाळा भेट 🌷
आज दि.13/1/2017ला पंचायत समिती चे विस्तार अधिकारी फुलझेले,शेंडे आणि केंद्रप्रमुख wandre ,गेडाम यांनी सकाळी  11 वा.इंदिरानगर शाळेला  भेट .
💥सर्व  शिक्षक  upsatit होते
💥इ. 1 ते 4 वर्गाला भेट देण्यात आली 
💥  मुले प्रचंड  उत्साही  होते .
💥 पाठचेे सुंदर सादरीकरण.
💥पाठावर आधारीत  मुलांनी  नाट्यीकरण सादर  केले .
💥मुलांनी पाठातील उता-याचे वाचन केले .
💥पाठात आलेली  नवीन  शब्दांचे लेखन  मुलांनी केले 
💥 आई,बाबा ,शेतमजूर या शब्दांपासून सर्व  मुलांनी  वाक्य  तयार  केले .
💥गटागटात मुलांनी  प्रश्न  तयार  केले व उत्तरे दिली .
💥म्हणीवर आधारित विष लेशन सादर केले.
💥मापन हे क्रिया प्रतायक्ष मुलांनी करून दा खवले.
💥कथेवर आधारित सर्व मुलांनी  चित्र  रेखाटन केले 
💥मुलांनी चित्र वाचन  केले .💥पाठातील  शब्दाचे वाक्यात  ऊपयोग
💥इंग्रजी विषयातील कविता गायन केले.
💥 इ. पहिलीतील  सर्व मुले  स्वतः  साहित्य  मधून  शिकत होती .प्रंचड आत्मविश्वास .
💥मुलै साहित्य  वापरून बेरीज ,वजाबाकी,गुणाकार भागाकाराची उदाहरणे सोडवून  शाब्दिक ऊदाहरणे तयार करीत  होती .
💥अक्षरावरुन शब्द .शब्दावरुन वाक्य  तयार  करीत  होती .
💥 शाळा या शब्दापासून शब्द  डोंगर  तयार केला .
💥 सर्व  मुलांनी वृक्षतोड या विषयावर  नाट्यीकरण सादर 
💥मुलांनी  कविता करून  सादरीकरण केले .
💥तिसरी मधील  मुलांनी गाय वर कथा  करुन दाखविल्या.
💥दुसरी मधील  मुलांनी संख्या  संख्या  तयार  करुन  बेरीज .वजाबाकीचे  उदाहरणे सोडविली,
💥शाळा भेटीत  रचवादाने मूल जलद गतीने  शिकू शकते हा अनुभव  मिळाला .

*शब्दाकंन
वर्षा फुलझेले 
विस्तार अधिकारी
बीट चिचपल्ली

                              🌷 नेतृत्व  विकास  कार्यक्रम  अंतर्गत  अधिकारी  शाळा भेट 🌷
आज दि.12/1/2016 ला मा.शरद पाटिल,प्राचार्य, चंद्रपूर ,धनपाल फटिंग,शि.वि.अ, रत्नमाला खोब्रागडे, KP यांनी सकाळी  11 वा.इंदिरानगर शाळेला  भेट .
🌱 सर्व  शिक्षक  वर्गात मुलांशी चर्चा  करीत  होते .
🌱इ. चौथी मध्ये  म्हणीची गंमत पाठ सुरू  होता .
🌱  मुले प्रचंड  उत्साही  होते .
🌱ERAC पद्धतीने  पाठाची सुरूवात .
🌱पाठावर आधारीत गटातील मुलांनी  नाट्यीकरण सादर  केले .
🌱मुलांनी पाठातील उता-याचे वाचन केले .
🌱पाठात आलेली  नवीन  शब्दांचे लेखन  मुलांनी केले 
🌱 मे,रविवार  या शब्दांपासून सर्व  मुलांनी  वाक्य  तयार  केले .
🌱गटागटात मुलांनी  प्रश्न  तयार  केले व उत्तरे दिली .
🌱म्हणीवर आधारित नाट्यीकरण सादर 
🌱पाठातील शब्दांवर आधारित  अंताक्षरी व शब्द खेळ 
🌱पाठातील पाच  व सहा अक्षरी शब्द  शोधून  वाचन 
🌱तीन गटात  तीन  शब्द  देऊन  कथा व काव्य  लेखन  मुलांनी अप्रतिम  काव्य  व कथा लेखन  करून  सादरीकरण.
🌱कथेवर आधारित सर्व मुलांनी  चित्र  रेखाटन केले 
🌱मुलांनी चित्र वाचन  केले .🌱पाठातील  म्हणीचा वाक्यात  ऊपयोग
🌱 इंग्रजी विषयातील पाठाचे अस्खलीत वाचन ,
🌱मुलांनी शाब्दिक उदाहरणे  तयार केले .
🌱 मुलांनी  भेट वस्तू  तयार करून भेट वस्तू  देऊन  निरोप  दिला .
🌷🌷🌷🌷
🌱 इ. पहिलीतील  सर्व मुले  स्वतः  साहित्य  मधून  शिकत होती .प्रंचड आत्मविश्वास .
🌱मुलै साहित्य  वापरून बेरीज ,वजाबाकी,गुणाकार भागाकाराची उदाहरणे सोडवून  शाब्दिक ऊदाहरणे तयार करीत  होती .
🌱अक्षरावरुन शब्द .शब्दावरुन वाक्य  तयार  करीत  होती .
🌱 आई या शब्दापासून शब्द  डोंगर  तयार केला .
🌱 सर्व  मुलांनी वृक्षतोड या विषयावर  नाट्यीकरण सादर 
🌱 मुलांनी  कविता करून  सादरीकरण केले .
🌱वर्ग शिक्षिका  प्रणिता मडँम खूपच आनंदी 
होत्या .
🌱 तिसरी मधील  तन्मयने जलद गतीने  कथा व करुन दाखविल्या.
🌱दुसरी मधील  मुलांनी संख्या खेळातून संख्या  तयार  करुन  बेरीज .वजाबाकीचे  उदाहरणे सोडविली,
🌱शाळा भेटीत  रचवादाने मूल जलद गतीने  शिकू शकते हा अनुभव  मिळाला .

शब्दांकन
पौर्णिमा  मेहरकुरे 
इंदिरानगर ,ताडाळी

ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषा पाठ 
प्रमुख श्री विजय भोयर यांनी चारगाव येथे  ज्ञानरचनावाद पद्धतीने केले पाठाचे उत्कृष्ट सादरीकरन 🌺
🌼पाठ-स्वच्छतेचा प्रकाश, इयत्ता- 5वी ,विषय - मराठी 🌼
🌷प्रथम पाठाचे मुकवाचन व प्रकटवाचनाची संधी सरांनी विद्यार्थ्यांना दिली .
🌷त्यानंतर पाठातील शब्द स्मरण करून विद्यार्थ्यांनी लिहिले .
🌷 विद्यार्थ्यांनी  सरांच्या मार्गदर्शनाने पाठाचे नाट्यीकरन सादर केले .
🌷पाठाचे उतारे गटात देऊन त्यावर प्रश्न तयार करन्यास विद्यार्थ्यांना सांगितले ,गटांत प्रश्नोत्तरे सराव घेतला .
🌷 पाठातील समानार्थी शब्द जोड्या उदा. समान -सारखे, विरुद्धार्थी शब्द जोड्या उदा.स्वच्छ - अस्वच्छ  मुलांनी शोधले.
🌷पाठातील काही वाक्ये घेऊन त्यातील नाम, क्रियापद , विशेषण मुलांनी सांगितले .
🌷पाठातील शब्द शोधून मुलांनी शब्दाची अंताक्षरी खेळही खेळला .
🌷पाठात आलेली नावे संत गाडगेमहाराज , सानेगुरुजी यांबद्दल मुलांनी छान माहिती सांगितली व ही माहिती आपण वाचनालयातील पुस्तकात वाचल्याचे सांगितले .
🌷 पाठात मुले खूपच आनंदाने सहभागी झाली .
🌷संपूर्ण पाठ उपक्रम , खेळ स्वरूपात सादर झाला .
🌷 या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पाठाचे उद्दिष्ट नक्कीच  साद्ध करता येतात हे सरांनी समजावले.
🌷 धन्यवाद सर 

शब्दांकन-
रुपाली मुसळे
चारगाव बीट - ताडाळी

॥ज्ञानरचनावादी उपक्रम/खेळ॥
पहिली/दुसरीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
भाषा
     १) शब्दचक्र २) शब्दकुंडी ३) माझी ओळख ४) चित्र व शब्द जोड्या ५) शब्दकोडे  ६) शब्दांची जत्रा ७) मुळाक्षर खेळ ८) शब्दांची आगगाडी ९) शब्द करामत १०) कविता तयार करणे. ११) गोष्ट तयार करणे. १२) एका शब्दावरून वाक्य तयार करणे. १३) चित्रवाचन १४) हवेत अक्षर गिरवणे. १५) पाठीवर अक्षर गिरवणे व ओळखणे. १६) शब्दकार्ड वाचन १७) चित्रासह शब्द वाचन १८) जोड्या लावणे. १९) सूचना खेळ २०) एका शब्दाशी संबंधित इतर शब्द सांगणे.

गणित
     १) १ ते १० संख्या गिरवा २) संख्यांची मांडणी ३) १ ते १०० संख्यावचन ४) आडवी बेरीज ५) आडवी वजाबाकी ६) उभा गुणाकार ७) उभी बेरीज-वजाबाकी ८) आगगाडी- संख्याक्रम खेळ ९) प्रतीके वापरुन संख्या ओळख १०) खड्यांचा खेळ ११) पतंग- स्थानानुसार संख्या बनवा १२) मासा- अंकावरून संख्या बनवा १३) टाळी आणि चुटकीचा खेळ १४) बेरीज- वजाबाकी आगगाडी १५) प्रतिकांच्या सहाय्याने लहान-मोठेपणा १६) पाढे तयार करणे. १७) लपलेली संख्या सांगणे. १८) माण्यांची माळ १९) नाणी-नोटा मोजणे. २०) सम-विषम संख्या खेळ
इंग्रजी
     १) Alphabetical Game २) Introduction Game ३) शब्दकुंडी खेळ ४) शब्दचक्र   ५) चित्रकार्ड वाचन ६) ध्वनीनुसार शब्द वाचन ७) चित्र-शब्द वाचन ८) सूचना खेळ
     मनोरंजक खेळ        चंपल खेळ

तिसरी/चौथीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
भाषा
     १) शब्दचक्र २) शब्दकुंडी ३) संवाद सादरीकरण ४) चित्र व शब्द जोड्या ५) शब्दकोडे  ६) शब्दांचा डोंगर ७) एका शब्दाशी संबंधित इतर शब्द सांगणे. ८) शब्दांची आगगाडी ९) शब्द करामत १०) कविता तयार करणे. ११) गोष्ट तयार करणे. १२) एका शब्दावर अनेक वाक्य तयार करणे. १३) एखाद्या प्रसंगाचे वर्णन करणे. १४) नाटयीकरण १५) चित्राचे वर्णन करणे. १६) शब्दकार्ड वाचन १७) सूचना खेळ १८) समानार्थी-विरुद्धार्थी जोड्या लावणे. १९) शब्दकोशाचा वापर करणे. २०) शब्दात लपलेले शब्द शोधणे.


गणित
     १) अपूर्णांक खेळ २) संख्यांची मांडणी ३) १ ते १०० संख्यावचन ४) आडव्या बैजिक क्रिया ५) संख्यांचे विस्तारीत रूप ६) उभा गुणाकार ७) उभी बेरीज-वजाबाकी ८) चढता-उतरता क्रम खेळ ९) प्रतीके वापरुन संख्या ओळख १०) खड्यांचा खेळ ११) पतंग- स्थानानुसार संख्या बनवा १२) मासा- अंकावरून संख्या बनवा  १३) आडवा गुणाकार खेळ १४) बेरीज- वजाबाकी आगगाडी १५) प्रतिकांच्या सहाय्याने लहान-मोठेपणा १६) पाढे तयार करणे. १७) लपलेली संख्या सांगणे. १८) घड्याळ खेळ १९) नाणी-नोटा मोजणे. २०) सम-विषम संख्या खेळ

इंग्रजी
     १) Alphabetical Game २) Introduction Game ३) शब्दकुंडी खेळ ४) शब्दचक्र   ५) चित्रकार्ड वाचन ६) ध्वनीनुसार शब्द वाचन ७) चित्र-शब्द वाचन ८) सूचना खेळ ९) संवाद १०) नाटयीकरण ११) शब्द आगगाडी खेळ १२) शब्दकोशाचा वापर करणे.



*!!वाचा व राबवा व आनंददायी शिक्षण द्या.!!***


01 .) स्मरण खेळ –

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो.
हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात.
मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.
नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात.
नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या.
त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
——————————————


02 ) ओंजळीने ग्लास भरणे –

मुलांना या खेळात फार आनंद मिळतो.
प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत.
नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे.
त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.
मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल.
ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लासभरावा लागेल.
या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.
यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पणमदत होईल.
——————————————


03) ठराविक वेळेत गणिते सोडवणे –

मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो.
 त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे.
सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे.
 अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.
या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
——————————————

04. ) एकमेकांना हसवणे –

मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा.
काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा.
मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही.
वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे.
जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.
—————————————

05. ) आवाज ओळखणे –

एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे.
त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे .
जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा .
असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा .
ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
——————————————

06.) खोक्यातील वस्तू ओळखणे –
एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .

—————————————————————————————

07.) वासावरून वस्तू ओळखणे –

बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.

—————————————————————————————

08.) फुगे फोडणे –

लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.

—————————————————————————————

09.) बॉल फेकून मारणे –

या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.

—————————————————————————————

10.) नेमबाजी –

ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
—————————————————————————————

11.) विद्यार्थी ओळखणे –

एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा.

—————————————————————————————

12.) बादलीत चेंडू टाकणे –

एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा.

———————————————————————————

13.) संदेश पोचवणे –

या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते.

—————————————————————————————

14.) आंधळी कोशिंबीर –

हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
—————————————————————————————

15.) विष – अमृत –

एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.⁠⁠⁠⁠






 सौजन्य - डायट  चंद्रपुर






डायट  चंद्रपुर
टाकाउ  वस्तु  पासून शै. साहित्य 







रचनावाद
    आकलनशास्त्र हा शिक्षणाचा बळकट पाया आहे.रचनावादाचा उगम आकलनशास्त्रातुन झाला आहे.
१) मुले आपल्या ज्ञानाची निर्मिती पुर्व ज्ञानाशी जोडुनआपली आपण करतात.
२) मिळालेल्या अनुभवातुन मुले भाषारुप देवुन शिकतात.
३) शिक्षणशास्त्र मुले स्वतःहून शोध घेवुन शिकतात.
४) मुले समाजसंपर्कातुन शिकतात.
५) बाह्य जगातील अनुभवांची प्रतिमानिर्मिती करुन मुले शिकतात.
६) मुले स्वतःच्या अनुभवांचा अर्थ लावुन शिकतात.
अंतर्गत भाषा -मनाची भाषा
बाह्य भाषा -समाजाची भाषा-अनुभवाची भाषा
.................,,.,..........
रचनावादी शिक्षण
मुले स्वतःचे स्वतः शिकतात.
स्वयंप्रेरणेने व आपल्या आवडीनिवडीने शिकतात.
अनेक प्रकारचे अनुभव घेवुन शकतात.
मुलं काहीतरी करत करत शिकतात.
मुल-मुली एकमेकांची मदत घेवुन शिकतात.
स्वतःहुन शिकण्याची रंधी मिळावी.कारण शिकणे म्हणजे आजुबाजुच्या जगाची ओळख करूण घेणे.मुले स्वतः शिकतात कारण ही निसर्गाने दिलेली देणगी आहे
मुले ढ नसतात काही मुले पुढे असतात तर काही अपुरी.बुद्धीमत्ता वेगळी असु शकते.
मेंदु हा माणसाचा शिकण्याचा अवयव आहे.जग समजुन घेण हे त्याच काम आहे.आपणहुन शिकणंहे नैसर्गिक असते.मुलांना स्वतःहुन शिकण्यास प्रवृत्त करा.संधी द्या.शोध घेतो तो शिक्षक.जो मुलांच्या सबलता ,सुदृढता,व सुप्त गूणांचा शोध घेतो.    

*Spoken English workshop*

स्थळ - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुटाळा

*शिक्षक समृद्धीकरण*

♦सगळ्यात महत्वाचे म्हणजे हि कार्यशाळा मागणी केलेल्या शिक्षकांसाठी होती.यात ताडाळी बिटातील शिक्षकांचा समावेश होता.
♦सुलभक म्हणून श्री सहारे सर उपस्थित होते.
♦शिक्षक व विद्यार्थी यांनी कसं इंग्रजी बोलावं यावर प्रामुख्याने विचारमंथन करण्यात आले.
♦इंग्रजी बोलणं किती सोपं आहे हे श्री सहारे सर यांनी सगळ्यांना समजावून दिल.
♦भाषा शिकविण्यापेक्षा *भाषानुभव*देणे गरजेचे आहे हे सांगितले.
♦एरव्ही इंग्रजीचा वर्ग म्हणजे शांत व काहींचे चेहरे घाबरलेले असतात पण आज वातावरण अगदी वेगळं होत जणू काही प्रत्येक शिक्षकाला आत्मविश्वास वाटत होता की आपण स्वतः व आपली विध्यार्थी सहज इंग्रजी बोलू शकतो.
♦सुरवातीला शिक्षक शंका मराठीत विचारत होते मात्र काही तासानंतर नकळत हीच प्रश्न इंग्रजीत यायला लागलीत.
♦विशेष म्हणजे काही विद्यार्थी पण सोबत होते त्यांचा यातील सक्रिय सहभाग मनाला आनंद देणारा व *तू हे करू शकतोस* हा आत्मविश्वास निर्माण करणारा होता.
♦वेळ कसा गेला कळलेच नाही वर्ग 6 वाजता संपला.
♦15 दिवसांनी परत भेटायचे नियोजन करण्यात आले.
♦विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ऍक्टिव्हिटी बुक ची खरेदी शिक्षकांनी केली.
♦श्री सहारे सर यांनी आपल्याला किती इंग्रजी येते हे दाखविण्याचा प्रयत्न केला नाही.माझ्यामुळे इतरांचं शिकणं कस सोपं होईल याकडे लक्ष दिलं.
♦इंग्रजी शिकण्याचे हे नवे पर्व सुरु करन्याचा आत्मविश्वास घेऊन प्रत्येक शिक्षक घरी परतला हि बाब मला पुढील कार्य करण्याचे बळ देऊन गेली.
        शब्दांकन 
*विवेक ईतडवार दाताळा


बिट ताडाळी१लीसाठी ज्ञानरचनावादी   उपक्रम

वर्गतयारी  मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=
१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.
२)चित्रगप्पा मारणे
३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.
४) न ठरवता गप्पा मारणे.
५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.
६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.

हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.

उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.

लेखनाचे उपक्रम
 १)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

गणित ➖

१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
ज्ञानरचनावाद दूतांसाठी खास+++

वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.

वाचन पुर्वतयारी—

१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह=उपक्रम.

१)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्‍या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.

२.) वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या. तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.
सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस.

३.)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

४) दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे. हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
अक्षर परिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा. आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा. आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
अक्षर दृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.

दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.

स्वरचिन्ह परिचय-

पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचेशाळासिध्दी विषयाशी अनेक शाळा व निर्धारकांकडून विचारणा होत आहे. सर्व निर्धारकांनी खालील माहीती शाळांना अवगत करावी. तसेच खाली दिलेल्या लिंकचा अभ्यास करुन काही सूचना व सुधारणा सुचवावयाच्या असल्यास मेल करावा.



यशस्वी माणसांमध्ये असे नेमके कोणते गुणधर्म असतात जे त्यांनी मिळवलेल्या यशासाठी कारणीभुत असतात?

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच व्यक्तींना यशस्वी माणसांबद्दल प्रश्न पडतात...

* यशस्वी माणसांमध्ये असे नेमके काय असते, ज्यामुळे ते यश संपादन करतात?
* सर्व यशस्वी माणसांमध्ये कोणत्या गोष्टी समान असतात?
* इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात येते कूठून?
* इतरांपेक्षा काय वेगळेपण त्यांच्यात असते?
* आपली स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने सातत्याने कृती करण्यास त्यांना कूठून प्रेरणा मिळते?
* आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर ते कोणत्या गुणांमुळे करतात?

वरील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात देणे अशक्य आहे. यशस्वी होण्यासाठी नक्कीच भरपुर गुण आपण स्वतःमध्ये अंगिकारले पाहीजेत. परंतु यशस्वी माणसांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यशस्वी माणसांच्या व्यक्तीमत्वामध्ये सात मुलभुत गुणधर्म असतात. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना कळतनकळतपणे यशस्वी व्यक्तींव्दारे जोपासले गेल्यामुळे त्यांनी जगात आपले अव्दीतीय स्थान निर्माण केले. ह्या सात मुलभुत गुणधर्मांना सतत खतपाणी घातल्याने ते पेटून उठतात व उत्तरोत्तर यशस्वी होतात.

यशस्वी माणसांचे सात मुलभुत गुणधर्म:

१) प्रचंड ध्यास:
यशस्वी माणसांना त्यांच्या ध्येयाने झापाटून सोडले असते. कोणत्या तरी विशिष्ट क्षेत्राचा किंवा कार्याचा त्यांना प्रचंड ध्यास असतो. या ध्यासापोटी ते सतत कृतीवर भर देतात. अडचणी जरी आल्या तरी प्रचंड ध्यासामुळे ते त्या अडचणींवर तुटून पडतात. परंतु बर्‍याच माणसांना कोणत्याच बाबतीत ध्यासच वाटत नाही व ते मरगळल्याप्रमाणे सर्वसाधारण जीवन जगतात. यशस्वी माणसांना त्यांचा 'ध्यास' सापडतो. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो व ते अर्थपूर्ण जीवन जगतात.

२) सकारात्मक समजुती:
आपण जे काही साध्य करतो त्या मागे आपल्या अंतरमनात रुजलेल्या समजुती कारणीभुत असतात. यशस्वी माणसांच्या काही विशिष्ट सकारात्मक समजुतीमुळे त्यांची स्वप्नं साकार होतात. परंतु सामान्य माणसे, त्यांच्यामध्ये क्षमता असुन सुध्दा आपल्या स्वप्नांपासुन वंचित राहतात. काही विशिष्ट व मुलभुत अश्या सकारात्मक समजुतींमुळे यशस्वी माणसे आपली ध्येय साध्य करतात.

३) जीवन मुल्यांबाबत स्पष्टता:
जीवन मुल्य म्हणजेच आपली वैयक्तीक नैतिकता दर्शवणारी यंत्रणा. बर्‍याच माणसांना आपली जीवन मुल्ये ठाऊक नसतात. ते नेहमी गोंधळलेले असतात. आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात महत्त्वाचे निर्णय घेण्यास ते असमर्थ असतात. यशस्वी माणसे मात्र आपल्या ध्येयांच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय आपल्या मूल्यांबाबत विचार करुन स्पष्टपणे घेतात.

४) माणसे जोडण्याची कला:
यशस्वी होण्यासाठी आपण एकटेच सर्वकाही करणे अशक्य आहे. यशस्वी माणसे यशस्वी होतात कारण त्यांना माणसे जोडता येतात. त्यांच्याबरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध प्रस्थापित करता येतात. इतरांची साथ लागल्याने यशस्वी माणसांना प्रगती करणे सोपे जाते. सर्वसाधारण माणसे मात्र याबाबतीत कमी पडतात.

५) अचुक आराखडा:
कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करण्याची विशिष्ट पध्दत असते. उदा. गाडी चालवणे, एखादा खाद्यपदार्थ बनवणे, एखादा खेळ खेळणे, कंप्युटरचा वापर करणे इ. त्याचप्रमाणे यश मिळवण्यासाठी विशिष्ट आराखड्याची गरज असते. दुर्दैवाने बरीच माणसे यशस्वी होण्यासाठी चुकीचा आराखडा वापरतात व त्यांना हवे ते परिणाम साध्य होत नाहीत. यशस्वी माणसे अचुक आराखड्याचा अवलंब करतात आणि आपल्याला हवे ते सहजपणे साध्य करतात.

६) सकारात्मक संभाषण:
यशस्वी माणसांना आपले विचार इतरांबरोबर प्रभावीपणे मांडता येतात. त्यांच्या सकारात्मक संभाषण कौशल्यामुळे त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येतो. परंतु बर्‍याच माणसांना आपल्या विचारांना इतरांसमोर स्पष्टपणे मांडता येत नाही. त्यांना इतरांवर प्रभाव पाडता येत नाही व ते एक सर्व साधारण जीवन जगतात.

७) सळसळता उत्साह:
यशस्वी माणसे प्रत्येक दिवस, सळसळत्या उत्साहाने कार्यरत असतात. त्यांच्याकडे न थकता अविरतपणे काम करण्याची असाधारण क्षमता असते. सर्वसाधारण माणसे मात्र लवकर थकतात, तणावग्रस्त असतात, त्यांच्या आयुष्यात उत्साहाची कमतरता असते. आपण जे करु ते सळसळत्या उत्साहाने जर केले तरच आपले ध्येय साध्य करणे सोपे होईल.