परिपत्रके



                       
              पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च २0१६-१७
 मध्ये इयत्ता चौथी व सातवी ऐवजी इयत्ता पाचवी व आठवीमध्ये घेण्यात येणार आहे. सोबतच या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूपदेखील बदलण्यात आले असून, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता विषयांवर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीन स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेत गणित व बुद्धिमत्ता या विषयांचा वरचष्मा राहणार आहे.

इयत्ता चौथी व सातवीसाठी आतापर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती; मात्र २0१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे.

२0१६-१७ या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच तीन पेपरऐवजी दोनच पेपर ठेवण्यात आले आहेत. या नव्या स्वरूपाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी गुण वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी ७0 गुण ठेवण्यात आले होते; परंतु आता नव्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी १00 गुण ठेवण्यात आले आहेत.

यापूर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे ३00 गुणांसाठी तीन पेपर घेण्यात येत होते. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी भाषा व ३0 गुणांसाठी इंग्रजी विषय होता. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेत ७0 गुणांसाठी गणित व ३0 गुणांसाठी परिसर अभ्यास या विषयांचा समावेश होता, तर तिसर्‍या प्रश्नपत्रिकेत ७0 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी व ३0 गुणांसाठी उर्वरित परिसर अभ्यास या विषयांचा समावेश होता. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या प्रश्नपत्रिके मध्ये ८0 गुणांसाठी भाषा व २0 गुणांसाठी इंग्रजी विषय होता. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी गणित व ३0 गुणांसाठी सामाजिक शास्त्र आणि तिसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये ७0 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी व ३0 गुणांसाठी सामान्य विज्ञान विषयाचा अंतर्भाव होता.

असे आहे शिष्यवृत्ती परीक्षेचे नवीन स्वरूप

१. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रथम भाषा ५0 गुण व गणित विषयासाठी १00 गुण.

२. दुसर्‍या प्रश्नपत्रिकेमध्ये तृतीय भाषा ५0 गुण व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी १00 गुण.

अशी राहिल बुद्धिमत्ता चाचणी

बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३0 टक्के गुणांचे राहणार असून मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४0 टक्के तर कठीण स्वरूपाचे प्रश्न ३0 टक्के गुणांचे राहणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावात बदल

आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा असे नाव होते; मात्र २0१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला आहे. आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना, या नावाने या परीक्षेस ओळखले जाणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीऐवजी पावचीमध्ये व सातवीऐजवी आठवीमध्ये आयोजित करण्याचे निश्‍चित केल्यानुसार सन २0१६-१७ मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या मराठी माध्यमाकरिता शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त अशी मार्गदर्शिका राज्य परीक्षा परिषदेमार्फत तयार करण्यात आली आहे.

                                                                     रा. वि. गोधने,

                                                         आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे.िकष आणि गुण*


                                     प्रगत शाळा करण्याचे निकष
 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष*  

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान 100  गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान 60 % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल


*महत्त्वाचे जी आर Gr reference*
1) शाळा बाह्य विद्यार्थी -20-5-2015
2) Adhar card-21.4.2015
3) नाविण्यपूर्ण उपक्रम-21.4.2015
4) महीला त. निवारण-14.1.2015
5) Kp Jobchaet-14.11.1994
6) मुले टिकवून ठेवणे-28.3.2014
7) संविधान वाचन-4.2.2013
8) SARAL-3.7.2015
9) PSM-22.6.2015
10) Yogdin-9.6.2015
11) गुणवत्ता कक्ष-21.11.2015
12) शाळासिध्दी-30.3.2016
13) समायोजन-12/18.5.2011
14) बदली-15.5.2014
15) संचमान्यता-28.8.15 & 8.1.16
16) CCE -20.8.2010
17) अतिथी नीदेशक-7.10.2015
18) SMC-17.6.2010
19) पालक संघ-24.8.2010
20) SSA जबाबदारी -4.9.2013
21) समायोजन अंपग-28.8.2012(प)
22) Beo jobchart-5.11.84 (P)
23) Jobchart-16.5.2014
                                   2.6.2914(P)
24)महाराष्ट्र दर्शन Gr -10.6.2015
25) साधन व्यक्ती -
         jobchart-6.6.15   (Scert) 
26) BrcLekha section jobchart
              4.2.2005 (MPSP)
27) शै.गुणवत्ता ता.समिती-23.12.05
28) साक्षर भारत.समिती-29.10.10
29) मित्र उपक्रम-27.1.2012 (P)
30) Self finance act-2012
         राजपत्र-19.1.2013
31) RTI2005-वै.माहीती-17.10.14
32) स्वच्छ वि.स्वच्छ MH -7.10.15
33) 25%प्रवेश-23.7.2015
34) Minorities gr-18.6.2014
35) RTE-09अधिसुचना-11.10.11
36) मुलभुत सुविधा निकष-29.6.13
37) मानव विकास-19.7.2011
38) प्रेरक नीवड-16.9.2011
39) मत्ता & दायित्व-   20.4.2015
                             Dt-02.6.2014
40) NOC CBSE-20.6.2012
41) उशिराने उपस्थिती -31.8.2006
                         सा.प्र.परीपत्रक .
42) पटपडताळणी-13.10.2014
43) C-1,2-शिस्तभंग-7.3.2015
44) स्वयसांक्षाकंन-9.3.2015
45) बिंदू नामावली-24.7.2014
46) गणेश उत्सव अभियान-2016.
       27.7.2016
47)खाजगी शाळा RTI-09
       dt-18.1.06 Dir pri letter .
48)PHP CA-2.8.2014
49) वै.प्रतीपूर्ती-16.11.2011
50) खाजगी शाळा अनुदान-  निकष-15.11.2011
51) CR -17.12.2011
52) शिक्षण सेवक Scale-14.10.10
53) खोटी तक्रार-25.2.2015 (सा)
54) RTI(05)-31.5.2012(एक अर्ज)
55) आश्वासीत प्रगती योजना-1.7.11
56) Kithchan shade-28.2.2014
57) राजीव.गा.अ.वि.यो.1.10.2013
58)शै.शु.Act-2011-16.4.2014(P)
59) Dist फिरते.पथक-18.4.2013
60)शा.मान्यता रद्द-18.4.2013
61) तक्रार निवारण समीती (GRM)
                        dt-21.4.2014 
62) पटपडाताळणी करवाही-2.5.12  
63) MS-CIT-5.5.2007
64) आम आदमी यो.-12.6.2013
65) RMSA-30.6.2010
66)  स्था.प्रा.जबाबदारी -31.12.13
67)बदली अधिनियम-30.10.2006
68)शाळा मान्यता बाबत-29.6.2013
69) RTE-2009-1.4.2010
70) समृद्ध शाळा-23.3.2016
71) शाळासिध्दी-30.3.2016
72) RYS-2015-dt-04.1.2016
73) तंबाखू मुक्त शाळा-7.7.2015 gr
74) ता.क्रीडा समिती-29.2.2016
75)दिव्यांग सवलती-8.1.2016
76) PSM निकष-23.3.2016 (प)
77) शाळा प्रवेश उत्सव-22.6.15+
                                   dt-9.6.2015
78) वृक्षलागवड-10.5.2016
79) केंद्रस्तर शिक्षण परीषद-1.9.16
80) दप्तराचे ओझे-21.7.15/28.4.16
82) ATL-1.7.2016
____________