इंदिरानगर शाळा
कु तनूजा मंगर बनली ceo
मा.धीवरे अति. जिल्हाधिकारी यांचे स्वागत करताना
चांदा पब्लिक स्कूल
डिजीटल शाळा भेट
या शाळेभेटी दरम्यान आम्ही आत्मसात केलेले
प्रमुख मुद्दे
१) शाळा डिजीटल करणे कठीण नाही.
2)डिजीटल शाळा व ई - लर्निंग शाळा यात काय फरक आहे.?
3)लोक वर्गणी कशी मिळवाल ?
४)ज्ञानरचनावाद व मुलांचे शिक्षण
५)प्रगत शैक्षिणिक महाराष्ट्र अंतर्गत पंचेविस निकष शाळेच्या पाठासोबत कसे
जोडावेत
आज शुक्रवार दिनांक १७/०२/२०१७ , "जिल्हा परीषद व पंचायत समिती
निवडणुका "आटोपून रात्री उशिरा पर्यंत कामे आटोपून सर्व शिक्षक उद्या कसे जायचे
या विवंचनेत झोपी गेले .सकाळी ठरलेल्या वेळी बरोबर ९ वाजता सर्व शिक्ष शिक्षिका जेवणाचे डबे घेऊन नियोजीत जागी आले. नियोजनाप्रमाणे प्रवासाला सुरूवात झाली.चार ट्राक्स मधून आमची वारी पोहचली इंदिरानगर शाळेला.
पोर्णिमाताई वर्गशिक्षिका वर्गात यायच्या अगोदरच मुलेबोलायवा
लागली.सर तुम्ही ईथे बसा .टिचर तुम्ही ईथे बसा .मी तनुजा इयत्ता ४थी आपले स्वागत करीत आहे ,व आपणासमोर एक गित सादर करीत आहे .असे म्हणत तीने एक पिशवी काढली.पिशवीमधून एक टोप काढला तो एका मुलीला दिला.एक दुपट्टा काढला तो तीला दिला .सर्वांनी डोक्याला बांधायला रिबिना घेतल्या.आम्ही सर्व गप्प आणी कुतूहलाने बघत होतो मुले समोर काय करतील ?
तनुजा खुर्चीवर उभी झाली फळ्यावर तारीख टाकली . विषय लिहीला मराठी घटक लिहीला "आभाळमाया " .एवढ्या वेळात पोर्णिमा टिचर ब्लुटूथ कनेक्टीव्हिटी असलेला स्पिकर घेऊन वर्गात आल्या .स्पिकर व मोबाईल चालु करून आभाळमाया ही कविता सुरू सुरू केली ..एवढ्या वेळात सर्व मुलांनी आपआपली जागा घेऊन चार चार मुलांच्या चार रांगा तयार केल्या होत्या .व एक मुलगी समोर ऊभी होती ..कविता सुरू होताच सर्व मुलांनी ठेका पकडला व कविता गात गात कडव्याप्रमाणे एक एक विद्यार्थी समोर येऊन व इतर रांगेतच राहुन कृती करू लागली.अप्रतीम कलाकृती सर्व शिक्षक स्तंभित होऊन पाहातच राहीले. कविता संपली विद्यार्थी गटागटात बसली .पोर्णिमा टिचर खडू घेऊन फळ्याजवळ आल्या व मुलांना म्हणाल्या या कवितेतील नविन शब्द फळ्यावर लिहा.कोणताही शब्द पुन्हा नको यायला .सर्व मुले फळ्याजवळ आली व एक एक शब्द आठवून आठवून लिहू लागली .मग टिचर नी शब्दांचे वाचन घेतले .
समानार्थी शब्द ,विरूध्दार्थी शब्द.वाक्यात उपयोग.शब्दांवर मनोगत
प्रश्न व उत्तरे फेरी (गटागटाने ) वादविवाद संवाद सर्वच भाषेचे प्रयोग भराभर एकाच पाठात.सलग दोन तीन तासिका आम्ही सगळे खिळून होतो .जिथले तिथे उभे होतो.
नंतर काही मुलांनी विश्रांती घेतली .आम्ही रजा मागितली ..तनुजाने आभार मानले.चाकलेट करीता मुलांना पाठविले.व आम्ही निघालो नियोजित शाळेला भेटद्यायला.
खुटाळा .पडोळी फाट्यावरून अडीच तीन किलोमीटर अंतरावरील घुघ्घूस रोडवरील वस्ती.डिजीटल शाळा.आय एस ओ शाळा..रमणिय परीसरात प्रवेश करताच माझे मित्र श्री शंकर आसमपल्लीवार सरांनी सर्वांचे हसून स्वागत केले.पहीला वर्ग .दुसरा वर्ग असे सर्व वर्ग त्यांनी दाखविले.मी इंग्रजी विषयासंबंधाने मुलांशी चर्चा करीत होतो ,मुलांचे इंग्रजी चे ज्ञान भरपूर आहे.वाचन सर्वांनीच उत्तम केले.कोणतेही शब्द घेऊन इंग्रजी त कविता बनविता येईल का विचारले ..स्पष्ट नाही सांगितले .थोडी कल्पना दिली .अशी रचना करता येईल सांगितले .दोन तीन मुली तयार झाल्या .तेवढ्यात जेवनाची बेल झाली.मुलींना नंतर हे काम करा असे सांगून आम्ही पण डबे घेऊन झाडाखाली जेवण केले.सर्वांना चहा देण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाली बांधन्याचे काम करीत होते त्यांनी स्वतः च ओळख विचारली ओळख दिली .ते करीत असलेले कार्य श्रमदानातून करीत आहेत हे कळल्यावर शाळेचा लोकसहभाग समजून आला.
नंतर डिडीटल वर्ग सर्वांनी प्रात्यक्षिक सह समजून घेतला.स्वतः चा मोबाईल टिव्ही स्क्रीनवर बघून आनंद झाला.ज्यांच्या मोबाईल मध्ये स्क्रीन डिस्प्ले अप्लिकेशन होते तेच मोबाईल अट्याच झाले.इतर होऊ शकले नाही.अशाप्रकारे मोबाईल मधील माहिती स्क्रीनवर दाखवून अध्ययन अनुभव देणे म्हणजे डिजीटल अध्यापन होय हे कळले.चार वाजायला आले होते आता परतीचा प्रवास सुरू करायचा असे ठरले.सर्वांना एकत्रीत बसवून शंकर सरांनी चर्चा केली सर्वांचे शंकानिरसन केले शेवटी श्री कवाडे सर पिंपळनेरी यांनी आभार मानले व आम्ही निघालो एवढयात तीन मुली वही पेन घेऊन धावत आल्या.त्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद दिसत होता.त्यांनी इंग्रजी त कविता तयार केल्या होत्या.वाचून दाखवल्या सह्या घेतल्या व धावतच परत गेल्या.
शाळेतील शिक्षक दरमहा ५००/ रूपये व विद्यार्थी सुद्धा दरमहा २०/ रूपये शाळेला देतात .शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुद्धा मासिक मदत देऊन शाळेचा खर्च सांभाळतात.शाळेतच किंडर गार्डनचे वर्ग पालकांचे मदतीने सुरू आहेत.अगदी कॉन्व्हेन्टप्रमाणे .त्यामुळे मुलांचा पाया भक्कम बनला आहे.
खरेच शाळा असतात मुलेही असतात परंतू त्यांना आकार देणारे शिक्षकच महान असतात.त्रीवार नमन सर्व समर्पित शिक्षकांना . प्रशांत तड़स ,चिमूर
रचनावाद पाठ सादरीकरण
मा. प्रकाश मुकुन्द , EO SEC. अकोला रचनावाद समजून घेतांना
भागाकार करतांना पहिलितील मूल
बेरीज करतांना पहिलितील मूल
अक्षरावरून शब्द तयार करतांना पहिलितील मूल
भागाकार करतांना पहिलितील मूल
कथा सादर करतांना पहिलितील मूल
बाजार भेट
मुलांच्या मदतीने साहित्य निर्मिती